बौद्ध बांधव तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांच्यासाठी बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर, तालुका शाखा नांदेड व शहर शाखा नांदेड उत्तरच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 09/05/2025 ते दिनाक 18/05/2025 पर्यंत पर्यंत श्रामणेर शिबिराचे आयोजन श्रद्धा स्थळ भीमघाट येथे करण्यात आलेले आहे.
या शिबिराचे संघ नायक पुज्य भिकखु बी. संघपालजी महाथेरो असतील भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी श्रामनेर शिबिरात अद्याप सहभाग घेतलेला नाही त्यांनी आणि सर्व बौद्ध बांधवांनी या शिबिराचा लाभ घेऊन बौद्ध धम्माची शिकवण, पूजापाठ तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई यांच्या जीवनकार्याची माहिती, भारतीय बौद्ध महासभेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि ध्यानधारणा इत्यादी चा सखोल अभ्यास 10 दिवशीय श्रामनेर शिबिराच्या माध्यमातून करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्वांनी आयोजित केलेल्या श्रामणेर शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी अवाहन भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तर च्या वतीने करण्यात येत आहे याकरिता या व्यक्तींना संपर्क करावे असेही कळविण्यात येते गणपतराव गायकवाडअध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर 9527881901 दामोदर सरकट सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर 9881524941 ईश्वरराव जोंधळे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तर 9860461159