भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज दिनांक 24 एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आणि राष्ट्रनिर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ‘ या विषयावर दैनिक जनतेचा महानायकचे मुख्य संपादक सुनील खोब्रागडे हे व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचे अध्यक्षस्थानी श्रद्धेय भिक्खू विनयबोधिप्रिय उपस्थित असणार आहेत .
मूलगंध कुटी बुद्ध विहार तथागत नगर , संबोधी बुद्ध विहार पाली नगर , विश्वशांती बुद्ध विहार वैशाखी पौर्णिमा नगर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 30 एप्रिल रोजी विजय नगर मैदान विकास नगरच्या बाजूला कॅनल रोड तरोडा बुद्रुक येथे वीरेंद्र गणवीर लिखित आणि दिग्दर्शित चले हम प्रबुद्ध भारत की ओर या महानाट्य कलाकृतीचे आयोजन करण्यात आले आहे . याच दिवशी महात्मा फुले पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत समारोपिय मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या. आज दिनांक 24 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या सुनील खोब्रागडे यांच्या व्याख्यानास आंबेडकरी विचारधारेच्या तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
