कार्यकर्त्यांनी विकास निधी आणल्याने आमदार नाराज
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सावे आज नांदेडमध्ये आले असताना विकास निधीवरून झालेला नाट्यमय संघर्ष पहावयास मिळाला.
आज पालकमंत्री सावे नांदेडमध्ये असतात त्यांच्या स्वागतासाठी एकही आमदाराने हजेरी नाही लावली आ. राजेश पवार उशिरा आल्याने त्यांच्याकडून मी स्वागत त्यासाठी आणलेले पुष्पगुच्छ पालकमंत्र्यांनी स्वीकार केला नाही.

झाले असे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळजवळ 15 कोटी रुपयांचा निधी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी दिल्याचे कळते यावर आमदारांनी जे प्रस्ताव दिले होते या प्रस्तावाचा कुठलाही विचार न झाल्याने आमदारांची नाराजी पालकमंत्री सावे यांच्यावर दिसून आली दोन दिवसापूर्वीच आमदार भीमराव केराम,आमदार बाबुराव कोहलीकर, आमदार तुषार कपूर यांनी नाराजी व्यक्त करत तक्रारही केल्या याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले आमदारांनी जे प्रस्ताव दिले ते प्रस्ताव जिल्हाधिकारी मार्फत माझ्याकडे येतात आणि मी केवळ प्रस्ताव मान्य करत असतो आपले प्रस्ताव योग्य आहेत की नाही हे पाहण्याचे काम आमदाराचेच आहे त्यामुळे माझा काही रोल नाही असे त्यांनी आज स्पष्ट केले. नांदेडमध्ये पालकमंत्री आले असता स्वागत करण्यासाठी किमान पक्षाचे सर्वच आमदार उपस्थित राहतात परंतु आज केवळ शासकीय अधिकारी यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केल्याने उपस्थित त्यांना अनेक प्रश्न पडले . काही वेळानंतर आमदार राजेश पवार हे पुष्पगुच्छ घेऊन आले असता पालकमंत्र्यांनी ते पुष्पगुच्छ बाजूला ठेवा असे फार्मविले. पुष्पगुच्छ बाजूला ठेवून आ . राजेश पवार गेले यावरून आमदार आणि पालकमंत्री भुसभुस असल्याचे दिसून येत आहे कार्यकर्त्यांनी सरळ पालकमंत्र्यांची संपर्क साधून आपल्या विकास निधी मान्य करून घेतल्याने आमदार कशासाठी झालं असा प्रश्न आमदारांनाच पडला आहे








