Home / राज्य / 60 विद्यार्थी श्रीहरीकोटाला रवाना

60 विद्यार्थी श्रीहरीकोटाला रवाना

अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही देशाची अंतराळ संशोधनातील महत्त्वाची संस्था असून या ठिकाणावरून आकाशात भरारी घ्यायचे पंख आणि त्यासाठी लागणारे बळ घेऊन परत या, अशा शब्दांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागातील 60 गुणी विद्यार्थ्यांची एक टीम शैक्षणिक सहलीसाठी श्रीहरिकोटा येथे आज रवाना झाली.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड कार्यालय अधिनस्त शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी इस्त्रो येथे विमानाने रवाना झाले. त्यांना निरोप देताना श्रीहरीकोटा येथे आपण शैक्षणिक सहलीसाठी जातो आहे आणि त्या ठिकाणावरून नांदेडसाठी येतांना मोठ्या स्वप्नाची भरारी घेऊन येतो आहे, हे लक्षात ठेवावे असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी या विद्यार्थ्यांपैकी काहींनी आंतराळशास्त्र सारख्या विभागात काम केल्यास मला आनंदच होईल. हा एक प्रशिक्षण दौरा असून विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्रातील भरारी देण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात हा कल्पक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर, हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येकी शाळा 15 विद्यार्थी-विद्यार्थीनी असे एकूण 60 विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणुन सोबत शिक्षक, कर्मचारी हे सदर शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) श्रीहरीकोटा येथे 16 ते 19 एप्रिल 2025 या कालावधी जात आहेत.

हे विद्यार्थी हैद्राबाद येथून विमानाने जाणार आहेत. त्यांना आज हैद्राबादला बसने रवाना करण्यात आले. अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून सहलीस रवाना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांपटवार यांनी केले तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल