बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास हा 64 वा दिवस असून आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली

महाबोधी महावीर आंदोलन आता सर्व देशात पेटले असून सर्व देशातून या आंदोलनास समर्थन मिळत आहे 1949 अजून कायदा आहे तो रद्द करून महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी 64 दिवसापासून भंतेजींच्या मार्गदर्शनासाठी व नेतृत्वाखाली या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहेत या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे एड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी 16 आणि 17 या दोन दिवस या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार असून आज पहिल्या दिवशी त्यांनी या स्थळाला भेट दिली आणि आपले विचारही मांडले यावेळी उपस्थित भंते यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन आपले विचार मांडले

ते म्हणाले बिहार विधानसभेत या ऍक्ट विरोधात बोलणारे जो पर्यंत निवडून येत नाहीत तो पर्यंत न्याय मिळणार नाही
आंदोलने ही कधीच सोपी नसतात त्यास समर्थन आणि विरोधक असतात त्यासाठी आपण संपूर्ण पने तयार असलें पहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाहेरील देशात गेल्यास तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा भेट देतात आणि आम्ही बुधाच्या धर्तीवरून आलो असे सांगतात ही बाजू सुधा आंदोलनाच्या जमेची असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले
हा लढा यशस्वी झालच पाहिजे लढ्यास वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.







One Comment
Hi would you mind letting me know which webhost you’re working with? I’ve loaded your blog in 3 different web browsers and I must say this blog loads a lot quicker then most. Can you suggest a good hosting provider at a honest price? Many thanks, I appreciate it!